बालवैज्ञानिकांचे एकाहून एक प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

पहिली व दुसरीसाठीही आता वर्ग
पालकांच्या आग्रहास्तव या वर्षापासून पहिली व दुसरीसाठीदेखील विज्ञान वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. छोट्या हातांना योग्य मार्गदर्शनाखाली नवनिर्माण करू दिले, तर भावी पिढी फक्त पुस्तकी न बनता आत्मनिर्भर बनेल, असा विश्‍वास अनेक पालकांनी रविवारी संडे सायन्स स्कूलच्या प्रदर्शनानंतर व्यक्त केला.

पुणे - सौरऊर्जेवर चालणारी कार, पाण्यापासून वीजनिर्मितीचे मॉडेल, हवामान निरीक्षणाची उपकरणे, जीव आणि रसायनशास्त्रातील अनेक प्रयोग, भूकंपाची सूचना देणारी यंत्रणा, इंजिनचे कार्य, प्रकाशाचे प्रयोग, आपल्या आहारातील कर्बोदके-प्रथिनांचे महत्त्व ते इलेक्‍ट्रॉनिकचे प्रयोग आणि रोबोट, असे सुमारे दोनशेपेक्षा अधिक एकाहून एक सरस प्रकल्प व प्रयोगांचे सादरीकरण रविवारी (ता. २) सिंहगड रोडवरील अभिरुची मॉलमध्ये करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या प्रदर्शनात चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सुमारे पाच हजार विद्यार्थी व पालकांनी प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनासाठी अभिरुची मॉल अँड मल्टिप्लेक्‍सचे यशोधन भिडे यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगातून विज्ञान समजावे, यासाठी सकाळ यंग बझ व संडे सायन्स स्कूल यांच्या वतीने तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी एप्रिल ते जानेवारीदरम्यान दर रविवारी दोन तास प्रात्यक्षिक विज्ञान वर्ग पुण्यामध्ये चालविले जातात. यंदा या उपक्रमाचे आठवे वर्षे आहे. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. आगामी बॅचेस एप्रिलपासून सुरू होणार आहेत. प्रवेश व अधिक माहितीसाठी ९८५००४७९३३ / ९३७३०३५३६९ / ८७७९६७८७०९ या क्रमांकांवर संपर्क साधावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: science exhibition by sakal young buzz and sunday science school