बनसुडे विद्यालयात 
विज्ञान प्रदर्शन

बनसुडे विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

Published on

पळसदेव, ता. ८ ः राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पळसदेव (ता. इंदापूर) येथील एल. जी. बनसुडे विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रकल्पाचे सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
पर्यावरण संरक्षण, सौरऊर्जा, जलसंवर्धन, हवेचा दाब, ज्वालामुखी, पाण्याची घनता, चुंबकीय शक्ती यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे, सचिव नितीन बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, सुवर्णा वाघमोडे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विज्ञान शिक्षक ऋषिकेश गंगणे, मनिषा कुदळे, हर्षदा काठवते आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com