Covidgyan : वैज्ञानिक संस्था देणार वेबसाईटमार्फत विश्वसनीय माहिती देणार

Scientific institutions will provide reliable information through the web site of covid gyan
Scientific institutions will provide reliable information through the web site of covid gyan

पुणे : कोरोनाचा प्रसाराबरोबरच त्याविषयी भ्रामक आणि खोटी माहिती देणाऱ्या स्वयंघोषीत तज्ज्ञांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यावर उपाय म्हणून देशातील वैज्ञानिक संस्थांच्या वतीने खात्रीशीर माहिती देणाऱ्या बहुसंस्थीय आणि बहुभाषीय विज्ञान प्रसाराचा उपक्रम 'कोविडज्ञान' हाती घेण्यात आला आहे.

टाटा मूलभूत संशोधन संस्था, भारतीय विज्ञान संस्था आणि टाटा मेमोरिअल सेंटरच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी http://covid-gyan.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. 

कोविडज्ञान संकेतस्थळाची गरज स्पष्ट करताना प्रा. अमोल दिघे म्हणाले,"" कोरोनाविरूद्धची लढाई वैद्यकीय स्तराबरोबरच सामाजिक सुद्धा आहे. म्हणूनच समाजातील सर्व स्तरावरील लोकांना त्यांना समजू शकेल, अशा भाषेत विश्वसनीय माहिती उपलब्ध व्हायला हवी. त्यामुळे शक्‍य तेवढ्या भारतीय भाषांमध्ये यासंबंधीची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे.'' वैज्ञानिकांना सध्या दोन स्तरावर लढावे लागत आहे. एक म्हणजे कोरोनाची लस शोधणे आणि दुसरं म्हणजे सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत त्यांचे गैरसमज दूर करणे. 

संकेतस्थळाचे फायदे 
- विश्वसनीय आणि सखोल माहिती तज्ज्ञांकडून मिळणार 
- कोरोना विषाणूचे वर्तन, रोगाचा प्रसार आणि गती, निदानासंबंधी माहितीचे बारकावे समजणार 
- जागतिक पातळीवरील संशोधनाची माहिती मिळेल 
- खोट्या आणि भ्रामक कल्पनांना पायबंद बसेल 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com