आकाशगंगेच्या पालकाची पहिली प्रतिमा मिळविण्यात शास्रज्ञांना यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Galaxy
आकाशगंगेच्या पालकाची पहिली प्रतिमा मिळविण्यात शास्रज्ञांना यश

आकाशगंगेच्या पालकाची पहिली प्रतिमा मिळविण्यात शास्रज्ञांना यश

पुणे - आपली संपूर्ण आकाशगंगा (Galaxy) ज्या कृष्णविवराभोवती फिरते, त्या कृष्णविवराची पहिली प्रतिमा (Image) मिळविण्यात शास्रज्ञांना (Scientist) यश आले आहे. गुरुवारी (ता.१२) जर्मनीतील युरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरीच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेत शास्रज्ञांनी ही प्रतिमा जगासमोर सादर केली.

जगभरातील रेडिओ दुर्बिनींचा वापर करत इव्हेंट होरायझन टेलिस्कोप (ईएचटी) या खगोलशास्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय समुहाने ही कामगिरी पूर्ण केली आहे. आपली आकाशगंगा अर्थात मंदाकिनीच्या केंद्रात फक्त तारे फिरताना दिसत होते. ते ज्या महाकाय घटकाभोवती फिरत त्या कृष्णविवराची पहिली प्रतिमा आता प्राप्त झाली आहे. ब्रह्मांडातील बहुतेक सर्वच दीर्घिका अशाच महाकाय कृष्णविवराभोवती फिरत आहे. या प्रतिमेमुळे शास्रज्ञांना त्यांच्या संबंधी अधिक संशोधन करता येणार आहे. खरं तर आजवर कृष्णविवराच्या आत डोकावताच येत नव्हते. कारण प्रकाशही कृष्णविवराच्या गुरूत्वाकर्षणातून बाहेर पडू शकत नाही. पण रेडिओ लहरींच्या माध्यमातून शास्रज्ञांनी ही प्रतिमा प्राप्त केली आहे. एका काळ्याकुट्ट भागाभोवती वायूचे प्रकाशमान कडे या प्रतिमेत दिसत आहे. अॅस्ट्रोफिजीकल जर्नल लेटर्समध्ये हे संशोधन गुरुवारीच प्रकाशित करण्यात आले.

संशोधनाचा फायदा..

आपली आकाशगंगेच्या केंद्रस्थानी नक्की काय चालते, यावर प्रकाश पडेल. हे महाकाय कृष्णविवर भोवतालच्या अवकाशीय घटकांशी कसे वर्तन करते यासंबंधी नवी माहिती समोर येईल.

प्रतिमेसाठी पृथ्वीएवढी दुर्बीण..

कृष्णविवर पृथ्वीपासून सुमारे २७ हजार प्रकाश वर्षे दूर आहे. त्यामुळे चंद्राच्या आकाशाएवढे डोनट प्रमाणे हे कृष्णविवर भासते. कृष्णविवराची प्रतिमा मिळविण्यासाठी पृथ्वीवरील आठ रेडिओ दुर्बिणींना एकत्र करत पृथ्वीलाच जणू आभासी दुर्बीण तयार केले आहे. २०१७ पासून या संदर्भात संशोधन करण्यात येत आहे.

Web Title: Scientists Succeed In Getting The First Image Of The Galaxys Parent

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneParentsScientist
go to top