

मार्केट यार्ड, ता. ४ : गणेशोत्सवानंतर मासळी, मटण आणि चिकनला वाढलेली मागणी सलग दुसऱ्या आठवड्यातही कायम असून, पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवामुळे सामिष पदार्थांकडे नागरिकांचा कल वाढला आहे. यामुळे चिकनच्या भावात किलोमागे ३० रुपयांनी, तर मासळीच्या दरात २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
मासळीमध्ये सुरमई, पापलेटच्या भावात २० टक्क्यांनी, तर हलव्याच्या भावात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व प्रकारच्या मासळीचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. पावसाने फिरविलेली पाठ आणि पडलेल्या तीव्र उष्णतेचा परिणाम पक्ष्यांच्या वाढीवर होत असल्याने नेहमीच्या तुलनेत २० टक्के कमी आवक होत आहे. मागणी जास्त असल्यामुळे चिकनच्या भावात किलोमागे ३० रुपयांनी वाढ झाल्याचे चिकन विक्रेते रूपेश परदेशी यांनी सांगितले. मटणाचे भाव स्थिर असून, गावरान अंड्यांच्या भावात शेकड्यामागे ५० रुपयांनी, तर इंग्लिश अंड्यांच्या भावात पाच रुपयांनी वाढ झाली आहे.
गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (ता. ४) खोल समुद्रातील मासळी २० ते २५ टन, खाडीच्या मासळीची ४०० ते ५०० किलो आणि नदीच्या मासळीची ५०० ते ७०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेशमधून रहू, कतला आणि सिलनची मिळून २० ते २५ टन इतकी आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) ः
पापलेट : कापरी : १८००-२२००, मोठे : १८००-२०००, मध्यम : १२००-१४००, लहान : ९००-१०००, भिला : ७००-८००, हलवा : ६००-७००, सुरमई : ४००-९००, रावस : ८००-९००, घोळ : ८००-९००, करली : ३००-४००, भिंग : ३००-४००, पाला : १२००-१५००, वाम : पिवळी ९००-१०००, काळी : ४००, ओले बोंबील : १००-१८०. कोळंबी : लहान : १६०-२००, मध्यम : ३००-४००, मोठी : ५००-७००, जम्बो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ८००-९००, लॉबस्टर : २०००-२४००, मोरी : २५०-४००, मांदेली : १२०-१६०, राणीमासा : २००-२८०, खेकडे : ३५०-४००, चिंबोऱ्या : ७००. खाडीची मासळी- सौंदाळे : २५०-३००, खापी : २००-२५०, नगली : ४००-५००, तांबोशी : ५००-६००, पालू : ३००-३५०, लेपा : २००-२५०, बांगडा : २००-२८०, शेवटे : २००-२५०, बेळुंजी : १२०-१८०, तिसऱ्या : २५०-३००, खुबे : १२०-१६०, तारली : ३००-३५०. नदीतील मासळी : रहू : १४०-१८०, कतला : १८०-२२०, मरळ : ३००-४००, शिवडा : २००-२५०, खवली : २००-२५०, आम्ळी : १२०-१६०, खेकडे : २५०-४००, वाम : ३५०-४५०. मटण : बोकडाचे ८४०, बोलाईचे ८४०, खिमा ८४०, कलेजी ८८०. चिकन २५०, लेगपीस ३००, जिवंत कोंबडी १७०, बोनलेस ३५०. अंडी : गावरान (शेकडा) १२१०, डझन १५६, प्रतिनग १३. इंग्लिश (शेकडा) ५८०, डझन ७८, प्रतिनग ६.५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.