
पुणे : पुण्यासह राज्यातील आठ ठिकाणांहून जलविमान (सी प्लेन) सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या वतीने (एमएडीसी) राज्यातील आठ जलाशयांवर जल-हवाई तळ (वॉटर ऐरोड्रोम) तयार करण्यासंदर्भात सध्या खासगी संस्थेच्या वतीने सर्वेक्षण सुरू आहे. येत्या तीन महिन्यांत हे सर्वेक्षण पूर्ण होईल. त्यातून कोणत्या जलाशयावरून विमानसेवा सुरू करणे शक्य असेल, हे स्पष्ट होणार आहे.