Kukadi Project : कुकडीचे उन्हाळी दुसरे आवर्तन सुरु; प्रकल्पात 17.67 टक्के उपयुक्त पाणीसाठा

कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातून 24 फेब्रुवारी ते 16 एप्रिल दरम्यान उन्हाळी पहिले आवर्तन सोडण्यात आले होते.
Kukadi Project

Kukadi Project

sakal

Updated on

नारायणगाव - शेतकऱ्यांची मागणी व निर्माण झालेली पाणीटंचाई याचा विचार करून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार कुकडी प्रकल्पा अंतर्गत धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून डिंभे डावा कालव्याद्वारे मीना व घोड शाखा कालव्यात अनुक्रमे 200 व 100 कुसेक्स या दराने व वडज धरणातून मिना पूरक कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. 28 मे पासून कुकडी डावा कालव्यात पाणी सोडण्याचे नियोजन आहे. अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com