Coronavirus : दुसरी लाट नको, तर..! 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

निर्बंधामुळे उद्योग-व्यवसायातील अनेकांचे रोजगार गेले आहेत. वेतन कपातीमुळे काही कर्मचाऱ्यांचे हाल सुरू आहेत. हे टाळण्यासाठी कोरोनाची दुसरी लाट रोखण्याची गरज आहे.

पुणे - जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. मात्र नागरिकांनीही पुरेशी काळजी घ्यायला हवी. तरच ही लाट आपण वेळीच रोखू शकतो, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. 

खबरदारीच्या सूचना 
-युरोपातील काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर तेथे पुन्हा लॉकडाउन करण्यात आला आहे. 
-दिल्ली सरकारनेही कोरोनाची दुसरी लाट आल्याचे जाहीर केले आहे. 
-आरोग्य सेवा संचालनालयाने सर्व जिल्हा आणि महापालिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. 
 
पुणे जिल्ह्यातील स्थिती 
-पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 31 हजारांवर पोचला आहे. 
-ऑक्‍टोबरच्या तुलनेत सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. 
-सध्या सुमारे साडेनऊ हजार सक्रिय रुग्ण आहेत. 
-काही अपवाद वगळता सध्या बहुतांश व्यवहार खुले आहेत. 

औषधोपचार सुविधा 
- पुरेशा प्रमाणात बेड्‌स, औषधसाठा 
- पीपीई किट आणि मास्क 
- रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन 
- ऑक्‍सिजन उपलब्ध 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना 
अपेक्षित तपासण्या 
140 (प्रतिदिन, दहा लाख लोकसंख्येमागे) 
नमुना तपासणी क्षमता 
13000 (प्रतिदिन) 

ग्रामीण भागातील सुविधा 
कोविड रुग्णालये - 8 
कोविड आरोग्य केंद्रे - 128 
कोविड केअर सेंटर - 62 
वैद्यकीय मनुष्यबळ - 817 
रुग्णवाहिका - 184 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
लस येईपर्यंत जास्त खबरदारी घ्यावी 
कोरोनामुळे जिल्ह्यात आठ हजारांहून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. निर्बंधामुळे उद्योग-व्यवसायातील अनेकांचे रोजगार गेले आहेत. वेतन कपातीमुळे काही कर्मचाऱ्यांचे हाल सुरू आहेत. हे टाळण्यासाठी कोरोनाची दुसरी लाट रोखण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधक लस येईपर्यंत मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

Sakal Video Gallery पाहण्यासाठी येथे क्लिक करा

रुग्णालयांना बेड्‌स, पुरेसा औषधांचा साठा आणि ऑक्‍सिजन ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासह अन्य उपाययोजनांच्या माध्यमातून संभाव्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सक्षमपणे सामना करण्यास आपण तयार आहोत. 
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: second wave of coronavirus is expected