

Bike Accident
ESakal
लोणी काळभोर - कामावरून घरी परतत असताना भरधाव वेगाने चालविलेल्या दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे.