esakal | पिंपरीत विसर्जन घाटावर सुरक्षा यंत्रणा सज्ज 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरीत विसर्जन घाटावर सुरक्षा यंत्रणा सज्ज 

गणेशोत्सव सुरक्षित पार पडावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भाविकांच्या सुरक्षेसाठी 26 घाटांवर दहा दिवसांसाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवली आहे. 

पिंपरीत विसर्जन घाटावर सुरक्षा यंत्रणा सज्ज 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी (पुणे) : गणेशोत्सव सुरक्षित पार पडावा यासाठी पालिकेच्या वतीने भाविकांच्या सुरक्षेसाठी 26 घाटांवर दहा दिवसांसाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवली आहे. 

शहरातील सुभाषनगर, चिंचवड, सांगवी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, वाल्हेकरवाडी, थेरगाव, पुनावळे, चिखली, वाकड, मोशी आदी घाटांवर सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. अग्निशामक दलाच्या वतीने सर्व घाटांवर सुरक्षारक्षक नेमले आहेत. त्या 50 अग्निशामक दल, 20 होमगार्ड, 25 राज्य अग्निशामक प्रशिक्षणार्थी, क्रीडा विभागाचे 20 सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. 

अग्निशामक विभागाकडून लाइफ जॅकेट, लाइफ रिंग्स, दोरखंड, गळ, तसेच चार बोटी घाटांवर विविध ठिकाणी दिल्या आहेत. घाटांवर विजेच्या दिव्यांची सोय केली आहे. विसर्जनासाठी ठिकठिकाणी छोट्या हौद बांधले आहेत. निर्माल्यकुंड ठेवले आहेत. वाहनांची व्यवस्था केली आहे. मूर्तिदानासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. 

घाटांची डागडुजी करून त्याठिकाणी साफसफाई केली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने औषध फवारणी झाली आहे. विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनीही पिंपळे सौदागर महादेव मंदिराजवळ मूर्ती विसर्जन घाटावरील गर्दी टाळण्यासाठी मोठा हौद बनविला आहे. 

मूर्तींचे विसर्जन तळ्यात करावे
पिंपरी कॅंप, वैभवनगर रोड येथे माजी नगरसेवक डब्बू आसवानी यांनी गणपती विसर्जनासाठी 40 बाय 40, 20 बाय 40 व 30 बाय 40 फूट असे तीन खड्डे घेऊन तळे बांधले आहे. यासाठी जवळपास 20 लाखांपर्यंत खर्च आला आहे. भाविकांनी या तळ्यात मूर्तींचे विसर्जन केल्यास घाटावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. गतवर्षी दोन तळे होते. त्यात 5883 दान केलेल्या मूर्ती जमा झाल्या होत्या. या वर्षी तळ्यांची खोली 12 फुटांपर्यंत वाढविली आहे. 


पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पाण्यात उतरून भाविकांनी मूर्ती विसर्जन करू नये. पर्यावरण संरक्षणासाठी निर्माल्य नदीत टाकू नये. विसर्जन घाटावर एकावेळी अनेकांनी गर्दी करू नये. 
- किरण गावडे, अग्निशामक दल प्रमुख 
 

loading image
go to top