esakal | पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता. १६) दिवसभरात कोरोना रुग्णांची काय आहे आकडेवारी पहा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Virus

पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता. १६) दिवसभरात ४ हजार ६५६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील २ हजार १२० जणांचा समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात ३ हजार ५०५ रुग्ण कोरोनातून पुर्णपणे बरे झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता. १६) दिवसभरात कोरोना रुग्णांची काय आहे आकडेवारी पहा सविस्तर

sakal_logo
By
गजेंद्र बडे

पुणे - पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.१६) दिवसभरात ४ हजार ६५६  नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील २ हजार १२० जणांचा समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात ३ हजार ५०५ रुग्ण कोरोनातून पुर्णपणे बरे झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिवसभरातील एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील १ हजार १०४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ९९४, नगरपालिका क्षेत्रातील ३४९ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील ८९ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४३ जण आहेत. याशिवाय पिंपरी चिंचवडमधील १२, जिल्हा परिषद क्षेत्रातील १४ आणि नगरपालिका क्षेत्रातील ५ रुग्ण आहेत. आज कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही काल (ता. १५) रात्री ९ वाजल्यापासून आज (ता. १६) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या २४ तासांत कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील १ हजार ८८३, पिंपरी चिंचवडमधील १ हजार ७४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३३१, नगरपालिका क्षेत्रातील १९५ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील २२ जण आहेत. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ८८ हजार १५४  झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत ५ हजार ३६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील १८८ जण आहेत.

Edited By - Prashant Patil

loading image