पाणी योजनांबाबत सुप्रिया सुळे काय म्हणतात पहा

SUpriya-Sule
SUpriya-Sule

पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील जनाई शिरसाई, पुरंदर उपसा, खडकवासला, गुंजवणी, भाटघर, मुळशी आणि टेमघर ही धरणे आणि पाणी योजनांबाबत प्रलंबित प्रश्‍नांवर त्वरित तोडगा काढावा. तसेच, मुळशी भागातील शेतकऱ्यांना पिण्यासाठी धरणाचे दोन टीएमसी पाणी कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

सिंचन भवन येथे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांसमवेत सुळे यांनी बैठक घेऊन विविध कामांबाबत आढावा घेतला, त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. या वेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. टेमघर धरण दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात येत आहे. ते करत असताना या पाण्यावर अवलंबून असलेल्या मागील काही गावांतील नागरिकांचे, तसेच शेतीचे पाण्याअभावी नुकसान होण्याची शक्‍यता आहे, तरी धरण रिकामे करताना त्यांच्यासाठी पाण्याची सोय होणे अत्यावश्‍यक असल्याचे सुळे यांनी निदर्शनास आणून दिले. 

भाटघर तसेच गुंजवणी धरणग्रस्तांचे प्रश्‍न तातडीने सोडवावेत. यापैकी गुंजवणी धरणग्रस्तांना घरांसाठी जागा दिल्या आहेत, तरी त्या अद्याप त्यांच्या नावावर झालेल्या नाहीत, त्या लवकरात लवकर त्यांच्या नावावर कराव्यात. खडकवासला धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करावे. याशिवाय जनाई शिरसाई योजनेतून सध्या काही गावांना आणि तेथील शेतीला पाणी दिले जाते, त्यात आणखी काही गावे वाढवावीत. जनाई शिरसाई कालव्याची गळती रोखण्यासाठी अस्तरीकरण करावे, ते दुरुस्त केल्यास वाचणारे पाणी अनेक वंचित गावांना पुरवता येईल, असेही सुळे यांनी सुचवले. त्याचबरोबर कऱ्हा नदीवरील बंधाऱ्यांच्या बाजूचे भराव अनेक ठिकाणी वाहून गेले आहेत, तर काही ठिकाणी त्यांची पडझड झाली आहे, त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना सुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com