pune municipal corporation encroachment crime
sakal
पुणे - शहरातील रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणांविरोधात आज नवव्या दिवशी महापालिकेने शहराच्या विविध भागात दोन लाख २२ हजार ८६० चौरस फूटावरील अतिक्रमण काढून टाकले. शहरात एकीकडे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे हटविली जात असताना काही भागांतील लहान राजकीय कार्यकर्त्यांची कार्यालये पाडली जात आहेत, तर दुसरीकडे नगरसेवक, महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या अनधिकृत कार्यालयांना अभय मिळत आहे.