Pune News : बचतगटाच्या महिलांची यंदा "जल दिवाळी'

पाणी वाटपाची यंत्रणा कशी काम करते याची माहिती शहरातील बचत गटाच्या महिलांना दिली जाणार आहे.
Khadakwasla Dam
Khadakwasla DamSakal

पुणे - खडकवासला धरणातून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी कसे येते, त्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध कसे केले जाते. पाणी वाटपाची यंत्रणा कशी काम करते याची माहिती शहरातील बचत गटाच्या महिलांना दिली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत ‘जल दिवाळी’ असा उपक्रम आयोजित केला आहे.

पुणे शहराला रोज १६०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (मिलिनियम लिटर पर डे -एमएलडी) पाणी पुरवठा होतो. खडकवासला धरण प्रकल्प आणि भामाआसखडे धरणातून येणारे पाणी सहा जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध करून ते थेट जलवाहिन्यांमधून थेट नागरिकांना उपलब्ध होते. शहराची वेळोवेळी झालेली हद्दवाढ व वाढती लोकसंख्या त्यामुळे शहराच्या सर्व भागात शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे आव्हान महापालिकेला पेलावे लागते. परंतु, ही प्रक्रिया कशी केली जाते याची माहिती सामान्य नागरिकांना नसते.

Khadakwasla Dam
Narayangaon Grampanchyat Election Result : लोकनियुक्त सरपंचपदी डॉ. शुभदा वाव्हळ यांची निवड

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडून अमृत २.० योजनेअंतर्गत "जल दिवाळी' उपक्रम साजरा करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. या निमित्ताने "पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी अभियान' हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात प्रत्येक भेटीसाठी ५० हजारांचा खर्च अपेक्षित असून केंद्र शासनाच्या अमृत योजनेच्या निधीतून तो केला जाणार आहे.पुणे शहरात ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत या सहा जलशुद्धीकरण केंद्रांना बचत गटाच्या महिला भेटी देणार आहेत.

येथे दिल्या जाणार भेटी

पर्वती येथील दोन केंद्र, लष्कर, होळकर, वारजे आणि वडगाव येथील जलशुद्धीकरण अशा सहा ठिकाणी भेटी आयोजित केल्या आहेत.

उद्देश काय?

- शुद्ध व निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याची प्रक्रियेबाबत महिलांना शिक्षित करणे

- स्वच्छ पाणी पुरवठ्याच्या प्रक्रियेची माहिती देणे

- पाणी पुरवठ्याच्या सुविधेबाबत महिलांमध्ये आपलेपणा आणि मालकीची जाणीव वाढविणे

- जलकेंद्रांना भेटी देणाऱ्या महिलांना स्मृतीचिन्ह व भेट वस्तू देऊन या उपक्रमाच्या स्मृती जपल्या जाणार

- पाणी पुरवठा विभागाच्या आगामी योजनांमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न

‘केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेअंतर्गत "जल दिवाळी' उपक्रम राबविला जाणार असून, बचत गटाच्या महिला जलशुद्धीकरण केंद्रांना भेटी दिल्या जाणार आहेत. प्रत्येक केंद्रावर साधारणपणे ३० महिला भेट देणार आहेत. पाणी पुरवठा विभागाच्या आगामी प्रकल्पात या महिलांना कसे समाविष्ट कसे करून बाबतही विचार केला जाईल.’

- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com