DRDO च्या वतीने आत्मनिर्भर भारत अंतर्गत; ‘डिफेन्स क्रिटिकल टेक्नॉलॉजी’ प्रयोगाची सुरवात

याचाच एक भाग म्हणून पुण्यातील सशस्त्र संशोधन आणि विकास आस्थापणेद्वारे (एआरडीई) ‘पॉवर काडतुसे आणि कॅनॉपी सेव्हरन्स सिस्टमचे विकासातील ट्रेंड’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
Under Self-Reliant India DRDO beginning of Defense Critical Technology experiment ARDE pune
Under Self-Reliant India DRDO beginning of Defense Critical Technology experiment ARDE pune sakal

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वतीने आत्मनिर्भर भारत संकल्पने अंतर्गत स्टार्टअप, नागरिक, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, एमएसएमई व उद्योजकांसाठी ‘डिफेन्स क्रिटिकल टेक्नॉलॉजी’ या नव्या प्रयोगाची सुरवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून नुकतेच पुण्यातील सशस्त्र संशोधन आणि विकास आस्थापणेद्वारे (एआरडीई) ‘पॉवर काडतुसे आणि कॅनॉपी सेव्हरन्स सिस्टमचे विकासातील ट्रेंड’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेचे उद्घाटन क्षेपणास्त्र आणि सामरिक यंत्रणेचे महासंचालक डॉ. बी एच व्ही एस नारायण मूर्ती यांच्‍या हस्ते झाले. सशस्त्र आणि लढाऊ अभियांत्रिकीचे महानिदेशक पी के मेहता, एमएसएसचे महानिदेशक डॉ. सतीश कुमार, उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळेचे (एचईएमआरएल) संचालक के.पी.एस मूर्ती, एआरडीईचे संचालक डॉ. व्ही वेंकटेश्‍वर राव आदी उपस्थित होते. कार्यशाळेत अभियांत्रिकी, विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी, एमएसएमई व स्टार्टअपचे प्रतिनिधी, आयुध निर्माण कारखाने व डीआरडीओतील कर्मचाऱ्यांसह तिन्ही दलातील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी डिझाइन, उत्पादन, गुणवत्ता, चाचणी आणि पॉवर काडतुसेच्या विविध चरणांचे मूल्यमापन यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ‘कॅनॉपी सेव्हरन्स सिस्टम’च्या तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणावर चर्चा करण्यात आली. अत्याधुनिक छत विच्छेदन प्रणाली, आपत्कालीन परिस्थितीत वैमानिकांचे जीव वाचविण्यासाठी विविध पॉवर काडतुसे तंत्रज्ञान, विस्फोटक यंत्रणा, स्टेज सेपरेशन काडतुसे तसेच लष्करी आणि अवकाश अनुप्रयोगांसाठी सिग्नल काडतुसे अशा विषयांचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com