Cheese
sakal
पुणे - कालबाह्य झालेले (एक्स्पायरी डेट उलटलेले) चीज विकणे आणि पनीर व शाम्पू विकताना छापील किमतीपेक्षा जास्त पैसे उकळून ग्राहकाची फसवणूक करणे नामांकित ‘रिटेल’ ब्रँडला महागात पडले आहे.
ग्राहक आयोगाने या कंपनीला ग्राहक सेवेत त्रुटी आणि अनुचित व्यापार पद्धतीबद्दल दोषी धरले असून, कालबाह्य चीज आणि चढ्या दराने पनीर व शाम्पू विकून घेतलेले जादाचे १३८ रुपये वार्षिक आठ टक्के व्याजासहित ग्राहकाला परत करावेत, तसेच
ग्राहकाला दिलेल्या मानसिक त्रासाची भरपाई व तक्रार खर्चापोटी ३० हजार रुपये द्यावे, असा निकाल आयोगाने दिला.