Pune Crime : पोलिसांचा धाक नाहीच ? कोयता गँगच्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime

Pune Crime : पोलिसांचा धाक नाहीच? कोयता गँगच्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची दहशत सुरू आहे. पोलिसांनी कारवाई करूनही त्यांचे वारंवार हल्ले सुरूच आहेत. पुण्यात कोयत्याने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यात कथित कोयता गँग चे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

शिवाजीनगर जवळ मैदानवर झोपलेल्या नागरीकावर काही तरुणांनी कोयत्याने हल्ला केला. जुन्या भांडणाचा राग मनात धरून या तरुणांनी ज्येष्ठ पती-पत्नीवर कोयत्याने खुनी हल्ला केला आहे. पुण्यातील शिवाजीनगर भागातील एका मोकळ्या मैदानावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

हे ही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

फिर्यादी सतीश काळे यांचे काही तरुणांसोबत चार महिन्यापूर्वी किरकोळ कारणातून बाचाबाची झाली होती. या भांडणाचा राग मनात धरत चौघांनी मिळून काल रात्री हल्ला केला आहे. दाद्या बगाडे ,दिपू शर्मा, तुषार काकडे आणि मोन्या कुचेकर या चौघांविरोधात शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Pune Crime : पुण्यात पुन्हा कोयत्याची दहशत, 'लग्नामध्ये नाचताना तरुणावर..'

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश भीमा काळे हे आपल्या पत्नी आणि मुलाबाळासह शिवाजीनगर भागात असलेल्या एका मैदानावर रात्री झोपले असताना टोळक्याने हातात कोयते घेऊन त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर परिसरात दहशत माजवत कोयता टोळीने हल्ला केला. पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा: Nitin Deshmukh : ''... म्हणून मी कपडे घेऊन चौकशीला जात आहे''

टॅग्स :punecrime