ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चऱ्होलीत लंपास

ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चऱ्होलीत लंपास

Published on

आळंदी, ता. २६ : चऱ्होली खुर्दमधील शिवेंद्र पार्क गल्ली मागे पावरहाऊस जवळ मंगळवारी (ता. २४) ८० वर्षांच्या वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसका मारून जबरदस्तीने चोरी करणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात आळंदी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भामाबाई पानमंद (वय ८०, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता.२५) फिर्याद दिली. अंदाजे तीस हजार किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोने चोरट्यांनी चोरल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com