आंबेगावच्या ज्येष्ठ नागरिकांनी दाखवून दिले, हम किसी से कम नहीं...

video call
video call

सातगाव पठार (पुणे) : सध्याच्या कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष सभा घेणे शक्य नसल्यामुळे आंबेगाव तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समन्वय समितीने ऑनलाईन सभा घेत आम्ही देखील तंत्रज्ञानाच्या बाबतीत कुठेही मागे राहिलेलो नाहीत, हे सिद्ध करून दाखविले आहे. यावरूनच आंबेगावातील ज्येष्ठ नागरिक देखील आता तंत्रस्नेही झाल्याचे दिसून आले आहे.

आंबेगाव तालुक्यात ज्येष्ठ नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कळंब (ता. आंबेगाव) येथील दशरथ भालेराव यांच्या प्रयत्नांतून सन 2006 मध्ये समितीची स्थापना करण्यात आली. या वेळी विठ्ठल महामुनी, बच्चूभाई ईनामदार, रामदास बेंडे आदींनी सहकार्य करून तालुकापातळीवर समन्वय समितीचे काम जोरात सुरू केले. त्यातून तालुक्यात तब्बल 53 ज्येष्ठ नागरिकांचे संघ स्थापन केले. या समितीचे कार्याध्यक्ष काशिनाथ वळसे यांची फेस्कॉम पुणेच्या उपाध्यक्षपदी, तर मंदाताई हिंगे यांची महिला प्रतिनीधी म्हणून निवड करण्यात आली.

या समन्वय समितीची दर 1 तारखेस ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात बैठक होत असते. मात्र, सध्या कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष बैठक घेणे शक्य नव्हते. त्यामुळे उपाध्यक्ष ए. एफ. ईनामदार यांनी समन्वय समितीची ऑनलाईन सभा घेऊ, असा विचार व्यक्त केला. यावर लगेचच कार्यवाही करत पेठ येथील वाकेश्वर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास रासकर यांच्या सहकार्याने समितीच्या दोन ऑनलाईन सभा घेण्यात आल्या. या वेळी घेतलेल्या आनलाईन सभेत समितीमधील 21 सदस्यांपैकी 17 सदस्यांनी हजेरी लावली होती. तसेच, फेस्कॉम पुणेचे अध्यक्ष चंद्रकांत महामुनी आणि सचिव हनुमंत कुंभार यांनी सदर सभेत ऑनलाईन उपस्थित राहत मार्गदर्शन केले. 

राज्यात ज्येष्ठ नागरीकांच्या समन्वय समितीची ऑनलाईन सभा घेणारी आंबेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती ही पहिलीच समिती आहे. त्यामुळे यांच्याकडून प्रेरणा घेत बाकीचे ज्येष्ठ नागरिकांचे संघ देखील ऑनलाईन सभा घेण्यास प्रेरीत होत आहेत. 
 - अरुण रोडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य फेस्कॉम  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com