
पुणे : ज्येष्ठ नागरिक, विधवा व दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येतात. त्यांचा लाभ सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी हयातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. त्यासाठी आता हेलपाटे मारायची गरज नाही. कारण केंद्र शासनाने ६५ वर्षांवरील केंद्र पुरस्कृत विशेष योजनेतील लाभार्थ्यांना हयात दाखला सादर करण्यासाठी ‘बेनिफिशरी सत्यापन अॅप’ विकसित केले आहे. अॅपच्या साहाय्याने लाभार्थी घरबसल्या मोबाईल कॅमेऱ्याद्वारे चेहरा दाखवून हयातीचे प्रमाणपत्र सादर करू शकतात.