भुईंज येथे जेष्ठ नागरिक संघटनेची बुधवारी सभा
ज्येष्ठ नागरिक संघाचा
भुईंजला आज वर्धापनदिन
भुईंज, ता. ३ : येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन सोहळा उद्या (बुधवारी) सकाळी दहा वाजता आचार्य भृगुऋषी मठ येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक देशमुख हे तणावमुक्ती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा आनंद कोल्हापुरे भूषवणार आहेत.
या वेळी पंचायत समिती सदस्या डॉ. सुरभी भोसले यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार केला जाणार आहे. भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर आयोजिण्यात आले आहे.
या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष रामदास जाधव, उपाध्यक्ष
जगन्नाथ दगडे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
----------------

