esakal | ज्येष्ठांना हवीत सुविधासंपन्न जीवनशैलीची घरे
sakal

बोलून बातमी शोधा

senior-citizen

कोरोनाच्या काळात घरातच राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला होता. अशा काळात हक्काचे घर नसलेल्या किंवा भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

ज्येष्ठांना हवीत सुविधासंपन्न जीवनशैलीची घरे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना संसर्ग संकटादरम्यान जिथे हक्काच्या घरांची गरज अधिक अधोरेखित झाली आहे, तिथे दुसरीकडे आगामी काळात ज्येष्ठांसाठीच्या सुविधासंपन्न घरांसाठीच्या (कम्युनिटी लिव्हिंग) मागणीत मोठी वाढ होताना दिसणार आहे. 

कोरोनाच्या काळात घरातच राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला होता. अशा काळात हक्काचे घर नसलेल्या किंवा भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र कोरोनाचा संसर्ग संपुष्टात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी (कम्युनिटी लिव्हिंग) असणाऱ्या सुविधासंपन्न घरांच्या मागणीत लक्षणीयरीत्या वाढ दिसणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कम्युनिटी लिव्हिंगची संकल्पना राबविणाऱ्या ‘कोलंबिया पॅसिफिक कम्युनिटीज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित निरुला म्हणाले, ‘‘भारताचे रजिस्ट्रार जनरल यांच्याकडील आकडेवारीवरून देशात २०२६ पर्यंत ज्येष्ठ नागरिकांची संख्या १७.३ कोटी असेल. आज पुणे महानगरात ज्येष्ठांची लोकसंख्या पाच लाखांहून अधिक आहे. निवृत्तिवेतनधारकांचे शहर अशी पुण्याची ओळख असली तरी ज्येष्ठांसाठीच्या जागतिक दर्जाच्या जीवनशैली, सुविधांसह असणाऱ्या प्रकल्पांबाबतीत इथे मोठी मागणी आहे. कोरोना संकटानंतर ही गरज अधोरेखित झाली आहे.’’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कम्युनिटी लिव्हिंगसंबंधाने न्याती ग्रुपचे संचालक प्रणव न्याती म्हणाले, ‘‘कोरोना संकटादरम्यान घरातील ज्येष्ठांसह सर्वांनाच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या काळातील अनुभव लक्षात घेता, ज्येष्ठांना सर्व सुविधांसह वैद्यकीय व रोजच्या गरजांसह, आधुनिक जीवनशैली अनुभवता यावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने व स्वतंत्रपणे राहता यावे, त्यांची शारीरिक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक उन्नती होईल असे वातावरण मिळावे.’’

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यात कम्युनिटी लिव्हिंगचा नवा प्रकल्प 
न्याती ग्रुप व कोलंबिया पॅसिफिक कम्युनिटीजचा पुढाकार
पहिला ‘सिनिअर सिटीझन लिव्हिंग’ प्रकल्प जाहीर
‘न्याती काउंटी’च्या मध्यभागी ३.६४ लाख चौरस फूट क्षेत्रावर प्रकल्प उभा राहणार 
ज्यात वन आणि टू बीएचके स्वरूपातील २०० घरे 
ही घरे ७३६ ते १३३१ चौरस फूट दरम्यान असणार
त्यांची किंमत ५० ते ८० लाखांपर्यंत असणार
ज्येष्ठांसाठी आवश्‍यक अत्याधुनिक सुविधा व वैद्यकीय मदतीव्यतिरिक्त अन्न, घरकाम व २४ तास साहाय्य

loading image