ज्येष्ठांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम

ज्येष्ठांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम

Published on

पिंपळे सौदागर, ता. १ ः लिनीयर गार्डन ज्येष्ठ नागरिक संघ, पिंपळे सौदागर यांच्यावतीने सर्व सभासदांसाठी खेळ, मनोरंजन आणि हास्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ९० ते १०० सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमात ज्येष्ठांसाठी विविध खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व सहभागी सदस्यांनी आनंदाने व उत्साहाने स्पर्धांमध्ये भाग घेतला. सोडतीमध्ये अविनाश पुराणिक यांना प्रथम पारितोषिक मिळाले. तसेच स्पर्धांमध्ये अशोक पाटील, किर्तीमाला मोरे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.
अध्यक्ष अशोक वारकर यांनी संयोजन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिमोहन तिवारी, सी. व्ही. ब्राह्मणकर, प्रदीप बादगुडे, बोरसे पाटील, विकास अकोले आदींनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com