कोरोना जिथून पसरला त्या वुहानच्या लॅबचे मालक बिल गेट्स - मेधा पाटकर

आंतरराज्यीय मजूर स्थलांतर कायद्यासंदर्भात कामगार आयुक्तांची भेट घेण्यासाठी त्या आल्या होत्या.
कोरोना जिथून पसरला त्या वुहानच्या लॅबचे मालक बिल गेट्स - मेधा पाटकर

पुणे : ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना (Corona) ज्या वुहानच्या (Wuhan Lab) प्रयोगशाळेतून निघाला त्याचा मालक दुसरा तिसरा कोणी नसून बिल गेट्स असल्याचे पाटकर यांनी म्हटले आहे. (Senior Social Worker Medha Patkar Allegations On Bill Gates)

कोरोना जिथून पसरला त्या वुहानच्या लॅबचे मालक बिल गेट्स - मेधा पाटकर
Goa Election : प्रशांत किशोर अन् TMC मध्ये काडीमोड?

आंतरराज्यीय मजूर स्थलांतर कायद्यासंदर्भात कामगार आयुक्तांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर बोलताना त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, बिल गेट्स फाऊंडेशनचा (Bill Gates Foundation) नेमके ध्येयधोरणं काय आहे असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात अनेक मजुरांना हजारो किलोमीटर पायी चालत जावे लागल्याबद्दल हळहळ व्यक्त केली.

कोरोना जिथून पसरला त्या वुहानच्या लॅबचे मालक बिल गेट्स - मेधा पाटकर
सातव्यांदा संसदरत्न ठरल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या; 'संसदेतील स्टाफ...'

कोरोना हा विषाणू ज्या प्रयोगशाळेतून जन्माला आला त्याचा मालक हा बिल गेट्स असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, बिल गेट्स यांच्या फाऊंडेशनने संपूर्ण जगातील शेतीवर (Farm Land) डल्ला मारण्याचा डाव आखला असल्याचे सांगत, गेट्स स्वतः 2 लाख 40 हजार एकरचे मालक असल्याचे पाटकर म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com