महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 17 सप्टेंबरपासून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून राहिल्या विधानसभा निवडणूकीसाठीची अंचारसंहिता 17 सप्टेंबरपासून लागू होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ऐन नवरात्रौत्सवात लोकशाहीच्या या उत्सवाला सुरूवात होणार आहे.  

पुणे : गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या विधानसभा निवडणूकीसाठीची अंचारसंहिता 17 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात लागू होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ऐन नवरात्रौत्सवात लोकशाहीच्या या उत्सवाला सुरूवात होणार आहे.  

गेल्या वेळेस विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता 15 सप्टेंबरला लागू झाली होती. मात्र पितृपंधरावडा असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरणे इच्छुकांनी टाळले होते. यंदा 29 सप्टेंबरला घटना स्थापना होणार आहे. आचारसंहितेचा कार्यक्रम हा 45 दिवसांचा असतो. ती लागू झाल्यानंतर चार ते पाच दिवसांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आठवडाभराचा कालवधी दिला जातो. त्यामुळे ऐन नवरात्रौत्सवाच्या शुभ मुर्हूतावर इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. 

मुख्यंमत्री यांच्या दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रा सुरू आहे. या यात्रेचा समारोप 19 ते 20 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिीतीत नाशिक येथे होणार आहे. या कार्यक्रमापूर्वी आचारसंहिता लागू होत असल्याने मोदी यांचा रोड शो आणि सभेच्या माध्यमातून निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचे नियोजन भाजपकडून करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From September 17 The Code of Conduct for the Assembly Elections will apply