Pune Crime : दीडशेहून अधिक घरफोड्या करणाऱ्याला अटक
Police Success : कोंढवा पोलिसांनी सलग पाच दिवस सीसीटीव्ही तपासून शहरात १५० पेक्षा अधिक घरफोड्या करणाऱ्या सराईत चोराला अटक केली असून त्याच्याकडून ३.४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पुणे : शहर परिसरात दीडशेहून अधिक घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला कोंढवा पोलिसांनी गजाआड केले. सलग पाच दिवस शंभराहून अधिक सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी ही कारवाइ केली. आरोपीकडून तीन लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला