Pune : तळेगाव चाकण महामार्गावर अपघातांची मालिका

कंटेनर अपघातामुळे दहा तास वाहतूक कोंडी, चालकाचा मृत्यू
Pune : तळेगाव चाकण महामार्गावर अपघातांची मालिका
Pune : तळेगाव चाकण महामार्गावर अपघातांची मालिका

तळेगाव स्टेशन : रहदारीने दिवसरात्र ओसंडून वाहणा-या अरुंद आणि अपघाती तळेगाव-चाकण महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून,शुक्रवारी (ता.१७) रात्री साडेअकराच्या सुमारास तोलानी गेटसमोर दोन कंटेनर एकमेकांना समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला.अपघातामुळे तळेगाव-चाकण महामार्गावर २० किलोमीटर टप्प्यात तब्बल दहा तास वाहतूक कोंडी झाली होती.

चाकण-तळेगाव मार्गावर भंडारा डोंगर पायथ्याशी तोलानी गेटसमोरील खड्डे चुकविण्याच्या नादात,चाकणहुन तळेगावकडे जाणारा कंटेनर क्रमांक एमएच-४० बीएल-९०७१ आणि चाकणहून तळेगावकडे जाणारा कंटेनर क्रमांक एमएच-४६ एच-३७१० यांची समोरासमोर धडक झाली. अपघातात कंटेनरचालक विकास गौस सिंह (२७,मुळ उत्तर प्रदेश,सध्या राहणार पनवेल,मुंबई) याचा चेपलेल्या केबिनमध्ये अडकून मृत्यू झाला.तर दुसरा कंटेनरचालक उद्धव पोपट नाकाडे (४०, ढोरजळगाव,शेवगाव,अहमदनगर) हा गंभीर जखमी झाला.अपघातात एका कंटेनरची केबिन तुटून बाजूला पडली तर दुसर्‍या कंटेनरच्या केबिनचा अक्षरशः चुराडा झाला.

Pune : तळेगाव चाकण महामार्गावर अपघातांची मालिका
मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' विधानाच्या पार्श्वभूमीवर राऊत वर्षा बंगल्यावर

समोरासमोर धडकलेले कंटेनर रस्त्यावर आडवे झाल्याने पुर्ण रहदारी ठप्प झाली.क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला काढेपर्यंत सकाळ झाली.त्यामुळे चाकण बाजूकडे थेट म्हाळुंगेच्या पुढे तर तळेगाव बाजूला पुणे मुंबई महामार्गावरील वडगावपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.तळेगाव-चाकण दरम्यान जवळपास वीस किलोमीटर टप्प्यात वाहतूक कोंडी झाली होती.कोंडीत अडकलेल्या काही वाहनांचे चालक गाडीतच झोपल्यामुळे मागील वाहने बराच काळ खोळंबली. कोंडीत बस अडकल्यामुळे तळेगाव चाकण एमआयडीसीतील कामगारांना कार्यस्थळी पोहोचण्यास उशीर झाला.तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मारुती मदेवाड,पो.ह.प्रशांत भोसले,युवराज वाघमारे,केशव घोटकर यांच्यासह तळेगाव वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस हवालदार सुरेश ढवळे आणि सहका-यांनी अथक परिश्रम घेऊन शनिवारी (ता.१८) सकाळी दहापर्यंत सुरळीत केली.

Pune : तळेगाव चाकण महामार्गावर अपघातांची मालिका
'मुख्यमंत्री बदलण्याची वेळ आलीय'; पंजाब काँग्रेसमध्ये उडणार भडका

तळेगाव-चाकण महामार्गाला चक्रव्यूह कधी सुटणार?

तळेगाव-चाकण महामार्गावर अपवाद वगळता रोजच छोटे मोठे अपघात आणि कोंडी होत असते.सध्या या रस्त्यावर ठिकाणठिकाणी पडलेले खड्डे आणि रस्त्यावर उभ्या अवजड वाहनांमुळे जीवघेणे अपघात वाढले आहेत.तीन वर्षांपुर्वी राष्ट्रीय महामार्ग घोषित होऊनही अद्याप मैलाचा दगडही लागलेला नाही.निष्क्रिय प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे धोकादायक बनलेल्या तळेगाव-चाकण महामार्गाला चक्रव्यूह कधी सुटणार?हा प्रश्न कायम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com