पुणे : उर्से खिंडीत टँकर चालकामुळे टळला भीषण अपघात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

ऊर्से खिंडीतून उतारावरून जाणाऱ्या चालकाने अचानकपणे ब्रेक दाबल्याने मोठा अपघात टळला यामुळे गॅसचा टँकर बाजुकडील लोखंडी संरक्षक कठयाड्याला जाऊन धडकला. सकाळी नऊ वाजता ही घटना घडली.

बेबडओहोळ : ऊर्से खिंडीतून उतारावरून जाणाऱ्या चालकाने अचानकपणे ब्रेक दाबल्याने मोठा अपघात टळला यामुळे गॅसचा टँकर बाजुकडील लोखंडी संरक्षक कठयाड्याला जाऊन धडकला. सकाळी नऊ वाजता ही घटना घडली.

ऊर्से खिंडीतून द्रुतगती महामार्गाकडे जाताना उतारावर गॅस टँकरच्या चालकाने अचानकपणे ब्रेक दाबल्याने पुर्ण टँकर जागीच फिरला अन् बाजुच्या लोखंडी संरक्षक कठडे यावर जाऊन धडक दिली. यामुळे पंधरा मिनिटे वाहतूक जाम झाली होती. जवळ असणाऱ्या वाहतूक पोलिस व कर्मचारी यांनी टँकर बाजुला काढुन वाहतूक सुरळीतपणे सुरू केली.

सुदैवाने टँकर पलटी झाला नाही,अन्यथा या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली असती असे मत ठिकाणी मदत करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Serious accident avoided a due to The tanker driver at Urse Khind in pune