Service Road Expansion Begins on Khed Shivapur-Dehu Road
sakal
पुणे - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने खेड शिवापूर ते देहूरोड दरम्यान असलेल्या सेवा रस्त्यावर दोन्ही बाजूने अतिरिक्त मार्गिकेचे काम सुरु झाले आहे. याशिवाय या सेवा रस्त्याचा दर्जा चांगला राहण्यासाठी काँक्रिटीकरण केले जात आहे.
४५ किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून त्यापैकी तीन किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण होण्यास किमान दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. यासाठी सुमारे ३२१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.