"जम्बो' सेंटरमधील रुग्णसेवा अखंडित 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर तंबू टाकून उभारलेल्या 800 खाटांच्या जम्बो कोविड केअर सेंटरमधील वैद्यकीय सेवा नियमित सुरू होती.

पुणे - मुसळधार पावसामुळे काही घरांमध्ये पाणी शिरले, झाडं उन्मळून पडली, सोसायट्यांच्या सुरक्षा भिंतीही कोसळल्या... अशा परिस्थितीतही जम्बो कोविड केअर सेंटरमधील वैद्यकीय सेवा अखंडित राहिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यातील रस्त्या-रस्त्यावर बुधवारी रात्री कोसळलेल्या धुवाधार पावसाने हाहाकार माजविला. त्याचवेळी शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर तंबू टाकून उभारलेल्या 800 खाटांच्या जम्बो कोविड केअर सेंटरमधील वैद्यकीय सेवा नियमित सुरू होती. यामागे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) अभियंते आणि दीपाली डिझाईन एक्‍सिबिट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे, अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली. गुरुवारी सकाळी सेंटरच्या सर्व तंबूचे दोर व्यवस्थित असल्याची खात्री केल्याची माहिती अभियंत्यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दीपाली डिझाईन एक्‍सिबिट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मयूर पटेल म्हणाले, ""सेंटरच्या परिसरात पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब वाहून जाईल, अशी सक्षम व्यवस्था केली. त्यामुळे पाणी साचून राहिले नाही.'' 

अत्यंत प्रतिकूल वातावरणातही या सेंटरमधील वैद्यकीय सेवा खंडित होणारी नाही, याची काळजी घेतल्याचे "पीएमआरडीए'चे अधीक्षक अभियंता मिलिंद बोंगाळे यांनी सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: services at Jumbo Covid Care Center remained intact