
पिंपरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे झालेल्या ‘सेट’ परीक्षेचा निकाल राज्य शासनाच्या प्रतिसादाअभावी तब्बल दोन महिन्यांहून जास्त काळ रखडला आहे. या परीक्षेला ‘एसबीसी’ आरक्षण लागू करावे की नाही, याबाबत ‘मायबाप सरकार’ने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्याचवेळी झालेल्या नेट परीक्षेचा निकाल मात्र २१ जुलै रोजी जाहीर झाला आहे.