पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागातर्फे घेतलेल्या ४० व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल शनिवारी (ता. ३०) जाहीर होणार आहे. सेट परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना शनिवारी निकाल घोषित होत असल्यामुळे दिलासा मिळाला आहे.