Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

पुणे शहराचा विस्तार आणि रस्त्यांच्या विकासाची गरज पाहता पाच परिमंडळांमध्ये पाच हॉटमिक्स प्लांट उभारणे आवश्‍यक आहे.
manjusha nagapur and naval kishore ram

manjusha nagapur and naval kishore ram

sakal

Updated on

पुणे - पुणे शहराचा विस्तार आणि रस्त्यांच्या विकासाची गरज पाहता पाच परिमंडळांमध्ये पाच हॉटमिक्स प्लांट उभारणे आवश्‍यक आहे. सध्या येरवडा येथे एक प्लांट असून, त्यवर ताण येत आहे. तसेच तेथील प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहराच्या हॉटमिक्स प्लांट उभारण्यासाठी लोकस्ती नसलेल्या भागात जागा शोधा असे निर्देश महौपार मंजूषा नागपुरे यांनी आयुक्त नवल किशोर राम यांना दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी पत्र पाठवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com