आझाद हिंद एक्‍सप्रेसमध्ये आढळले पिस्तुलातील सात जिवंत काडतुसे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

पुण्याहून हावडा येथे जाणारी आझाद हिंद एक्‍सप्रेस मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता घोरपडी यार्ड येथे सायडींगला लावण्यात आली होती. सफाई कर्मचाऱ्यांकडून या गाडीची साफसफाई करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी गाडीतील एस 2 या डब्यातील स्वच्छतागृहाजवळील कचऱ्याच्या डब्यामध्ये सात जिवंत काडतुसे, चार बुलेट आढळून आली.

पुणे : पुणे व पश्‍चिम बंगालमधील हावडा या दोन शहरांना जोडणाऱ्या आझाद हिंद एक्‍सप्रेस या रेल्वेच्या एका डब्यामध्ये मंगळवारी सकाळी पिस्तुलातील सात जिवंत काडतुसे आढळली. दरम्यान, ही काडतुसे कुठून व कोणी आणली, याचा लोहमार्ग पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. 

पुण्यात चालत्या एसटीने घेतला पेट, बस जळून खाक; एकदा व्हिडिओ पाहाच
 

पुण्याहून हावडा येथे जाणारी आझाद हिंद एक्‍सप्रेस मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता घोरपडी यार्ड येथे सायडींगला लावण्यात आली होती. सफाई कर्मचाऱ्यांकडून या गाडीची साफसफाई करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी गाडीतील एस 2 या डब्यातील स्वच्छतागृहाजवळील कचऱ्याच्या डब्यामध्ये सात जिवंत काडतुसे, चार बुलेट आढळून आली. लोहमार्ग पोलिसांनी पंचनामा करुन ते जप्त केले. तसेच लोहमार्ग पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

इंद्रायणी, सोलापूर एक्‍स्प्रेसमध्ये प्रवाशांची आसनक्षमता वाढली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven live cartridges were found in the Azad Hind Express Pune