

Gun Firing
शिरूर - ठेकेदारीच्या जुन्या वादातून सात जणांनी एकावर पिस्तुलातून गोळीबार केला. जीव वाचविण्यासाठी संबंधित तरूणाने तळ्यात उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. करडे (ता. शिरूर) येथील भैरवनाथ मंदिराच्या मागील तळ्याजवळ शनिवारी (ता. १८) मध्यरात्री हा थरार घडला. यातील सर्व तरूणांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.