
वारजे/माळवाडी : कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या रोज वाढत आहे. जिल्ह्यात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारीची उपाय म्हणून हवेली तालुक्यातील आणखी सात ग्रामपंचायतीचा परिसर आज शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी एका पत्राद्वारे आदेश काढला आहे.
पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
साथरोग प्रतिबंध कायद्याच्या तरतुदीनुसार व हवेलीच्या तहसिलदारांच्या अहवालानुसार हवेलीतील कोंढवे धावडे, न्यू कोपरे, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, नायगाव, सोरतापवाडी या ग्रामपंचायतीचा परिसरात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून आज शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजल्यासून सील केला जाणार आहे.
येथील संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी परिसर सील करण्याचे आदेशात दिले आहेत. ही गावं केंद्र बिंदू मानून तीन किलोमीटरचा परिसर बफर झोन (प्रतिबंधित क्षेत्र) करण्यात आला आहे. या परिसरात आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात याव्यात असे सांगितले आहे.
सील करण्यात आलेल्या भागात नागरिकांना प्रवेशबंदी व त्याभागातून बाहेर जाण्यास बंदी घातली आहे. तसेच अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर जाणाऱ्यांनी प्रत्येकांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले आहे.
सील करण्यात आलेल्या भागात लावण्यात आलेल्या निर्बंधातून कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार व तेथील मालाची आवक- जावक, जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने काम करणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहनांना या आदेशातून वगळले आहे.
पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनी काळजी घ्यावी-
नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये. लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत यांनी सामाजिक संस्था, स्वयंसेवक यांनी नागरिकांना अत्यावश्यक सेवा घरपोच देण्यासाठी पुढाकार घ्यावा. मदत करताना सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझेर यासह अन्य सुरक्षेची काळजी स्वतः घ्यावी. असे बारवकर यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.