
खडकी बाजार (पुणे) : पोलिस वसाहत येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात असलेल्या 8 जणांची तपासणी करून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. त्यापैकी 7 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून धक्कादायक म्हणजे त्यापैकी एक 7 वर्षाच्या बालिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयीन अधीक्षक सुजा जेम्स यांनी सकाळला दिली.
आणखी वाचा - भारीच की ! मदतीच्या गुणाकारासाठी संकेतस्थळ...
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी खडकीतील पोलिस वसाहतीमधील महिलेला तपासणी करून पिंपरी येथील एका रुग्णालयात पाठवले होते त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे त्या महिलेचा मृत्यू झाला.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
त्यानंतर संध्याकाळी त्या महिलेच्या संपर्कातील 8 जणांचा अहवाल खडकी बोर्डाकडे प्राप्त झाला असून त्यापैकी 7 जण निगेटिव्ह असून एक सात वर्षाची बालिका पॉझिटिव्ह असल्याची माहिती उघड झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.