मुळशीकरांना खतरा, दिवसभरात कोरोनाचे रुग्ण सतरा... 

corona1
corona1

पुणे : मुळशी तालुक्यात आज कोरोनाचे नवीन १७ रुग्ण सापडले असून, पौड पोलिसांनी बेशिस्त नागरिक व वाहनचालकांवर मोठी कारवाई केली आहे.

पिरंगुट : मुळशी तालुक्यात आज नवीन १७ कोरोनाबाधित सापडले असून, आता तालुक्यात एकूण १८७ कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. त्यात आठ पुरुष 
व नऊ महिलांचा समावेश आहे. आज मारूंजी येथे तीन, सूस येथे दोन, नांदे येथे तीन, नांदगाव येथे एक, भूगाव चार व पिरंगुट चार कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहे. आतापर्यंत तालुक्यातील तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, दोघेजण अद्याप अत्यवस्थ आहेत.  बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ५१ झाली आहे.      
केवळ सलग आठवडाभरात तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांनी शंभराच्या पुढे संख्या गाठली आहे. तिघांचा मृत्यू आणि दोघे गंभीर आणि आज सापडलेले 
सतराजण, या पार्श्वभूमीवर तालुक्यात चिंता वाढली आहे.  आठ तारखेला तालुक्यात तब्बल  २६ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले होते. दरम्यान, तालुक्यातील 
बहुतांशी गावांत जनता कर्फ्यू सुरू झालेला आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार लॅाकडाऊन सोमवारपासून पंधरा दिवस सुरू होणार असल्याने पिरंगुट व्यापारी संघटना व ग्रामस्थांनी पुकारलेला जनता कर्फ्यू उद्या व परवा शिथिल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.     

कोळवण : पौड पोलिसांनी भूगाव व पिरंगुट ग्रामपंचायतींना सोबत घेऊन तब्बल ७४ व्यक्तींवर कारवाई करून ३७  हजार रुपये दंड वसूल केला, तसेच मोटार वाहन कायद्यानुसार २२ जणांवर केस करून ८९०० रुपये दंड वसूल केला असून, विना मास्क फिरणाऱ्या ७ जणांवर, असे ऐकून १०१ जणांवर कारवाई केली आहे.

पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक अनिल लवटे, पोलिस हवालदार संतोष कुंभार, अब्दुल शेख, मयुर निंबाळकर, पोलिस शिपाई तुषार भोईटे, होमगार्ड पवार, होमगार्ड भजबळकर यांच्या पथकाने हि कारवाई केली.  नागरिकांना मोटर सायकलवर एक व फोर व्हिलरमध्ये तीनपेक्षा जास्त जणांनी प्रवास करू नये व  विना मास्क फिरू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Edited by : Nilesh Shende   
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com