dilip walse patil visit farmer agriculture loss
sakal
पारगाव - आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी- धामणी परिसरात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळाची तीव्रता जाणवु लागली आहे. शेती पाण्याअभावी करपू लागली असून पिके सुकू लागली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने महसूल विभाग, पंचायत समिती व कृषी विभाग यांच्या वतीने नुकसानीचे अचुक पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आल्याची माहिती माजी सहकारमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली.