Pune Traffic: धायरी रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच; वाहनचालकांसह स्थानिक रहिवासी त्रस्त, ठोस उपाययोजनांची मागणी
Pune News: नऱ्हे-धायरी रस्त्यावरील वाहतूक कोंडीत नागरिक दररोज अडकतात. प्रशासनाकडून उपाययोजना अपुऱ्या असून नागरिकांमध्ये संताप आहे. राजकीय उदासीनता आणि पंप, पार्किंगमुळे निर्माण झालेली समस्या आता आंदोलनापर्यंत पोहोचली आहे.
सिंहगड रस्ता : नऱ्हे-धायरी रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या परिसरातील नागरिकांच्या नशिबाला पूजलेली आहे. यामुळे नागरिकांची सुरक्षा व आरोग्य धोक्यात आले आहे.