Pune Traffic Issue : कोंडी भयंकर अन् वॉर्डन कागदावर; आयुक्तांकडून पुढील आदेशाची प्रतिक्षा

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यांना मदत करण्यासाठी म्हणून ५०० वॉर्डन नियुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. पण......
Pune traffic issue

Pune traffic issue

esakal

Updated on: 

पुणे - शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यांना मदत करण्यासाठी म्हणून ५०० वॉर्डन नियुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. पण ठेकेदाराची क्षमता व अन्य तांत्रिक बाबींवर प्रश्न उपस्थित झाल्याने या निविदेला आयुक्तांनी ऑक्टोबर महिन्यात स्थगिती देत, चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, दीड महिना उलटून गेला तरीही स्थगिती कायम आहे. निविदा रद्द किंवा काम पुढे सुरू ठेवायचे याचा कोणताही निर्णय झालेला नसल्याने कोंडी भयंकर अन् वॉर्डन कागदावर अशी स्थिती निर्माण झालेली आहे.

Loading content, please wait...