Pune Traffic : आयटी पार्कमध्ये सात किलोमीटर रांगा; हिंजवडी-माण भागात कोंडी; समस्या सोडविण्याबाबत अधिकारी निरुत्साही
IT Park Pune : हिंजवडी आयटी पार्क परिसरात खड्डे, खराब रस्ते आणि चिखलामुळे मंगळवारी पुन्हा एकदा प्रचंड वाहतूक कोंडी झाली. पीएमआरडीएच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
हिंजवडी : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मंगळवारी (ता.१७) पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. खराब रस्ते, चिखल आणि मोठे खड्डे यामुळे ऑफिसच्या वेळेत दोन ते तीन तास कोंडी होऊन तब्बल सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.