water shortage
sakal
पुणे - राज्यात भूपृष्ठ व भूगर्भ अशा दोन्ही स्रोतांचे जलनियोजन अर्धवट झाले आहे. त्यामुळे सिंचन व्यवस्था विस्कळित झाली आहे. शहरीकरणामुळे पुढे पाण्याची मागणी अजून वाढेल. परिणामी, शेतीसिंचनासमोरील संकट अजून गडद होऊ शकते. जलनियोजनाकडे आणखी दुर्लक्ष झाल्यास २०३१ नंतर राज्य भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर उभे असेल, असा इशारा अभ्यासकांनी दिला आहे.