Pune Dirty Water Issue : फुरसुंगीत घाण पाण्याचे साचले तळे; दुर्गंधीसह डासांच्या प्रादुर्भावातही वाढ, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Waterlogging in Fursungi : फुरसुंगीत सांडपाण्याच्या गळतीमुळे घाण पाण्याचे तळे साचले असून, दुर्गंधी आणि डासांचा उपद्रव वाढत आहे. स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला असून, प्रशासनाकडे त्वरित उपायांची मागणी होत आहे.
Dirty Water Pond in Fursungi Causes Health Riskesakal
फुरसुंगी : सांडपाणी वाहिनीला गळती होऊन फुरसुंगीमधील खंडोबाच्या माळाजवळ सिद्धी ग्रीन फेज-२ जवळ घाण पाण्याचे तळे साचले आहे. येथील सांडपाणी वाहिनीच्या गळतीवर त्वरित योग्य उपाययोजना कराव्यात, अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आहे.