#SexEducation नकळत्या वयात मातृत्वाचं ओझ...

माधुरी सरवणकर 
मंगळवार, 12 जून 2018

‘‘काही दिवसांपूर्वी नववीत शिकत असलेली एक मुलगी समुपदेशनासाठी आली होती... 

तिचा पाच वेळा गर्भपात झाला होता...’’ 
‘स्टेप अप’ या समुपदेशन संस्थेच्या संचालिका गौरी वेद सांगत होत्या. ही स्थिती त्या एकट्या मुलीची नाही. नकळत्या वयात मुली गरोदर राहत आहेत, हे महापालिकेच्या आरोग्य विभागातून मिळालेल्या गर्भपाताच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. 

‘‘काही दिवसांपूर्वी नववीत शिकत असलेली एक मुलगी समुपदेशनासाठी आली होती... 

तिचा पाच वेळा गर्भपात झाला होता...’’ 
‘स्टेप अप’ या समुपदेशन संस्थेच्या संचालिका गौरी वेद सांगत होत्या. ही स्थिती त्या एकट्या मुलीची नाही. नकळत्या वयात मुली गरोदर राहत आहेत, हे महापालिकेच्या आरोग्य विभागातून मिळालेल्या गर्भपाताच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. 

समोर आलेली कारणे 
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुला-मुलींची जवळीक वाढते; मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. 
कोवळ्या वयातील असुरक्षित शरीरसंबंधांमुळे गर्भधारणा होते. 
लग्नाचे आमिष दाखवून मुलींची फसवणूक केली जाते. 
पंधरा वर्षांखालील मुलींमध्ये बलात्कारामुळे झालेल्या गर्भधारणेचे प्रमाण अधिक आहे. 

लग्नाअगोदरच्या गर्भपाताचे प्रमाण वाढले आहे. पॉक्‍सो कायद्यांतर्गत गर्भपात करण्यासाठी आलेल्या रुग्णाची वयाची खात्री पटवून घेताना बंधने येतात. म्हणून गर्भपात करायला उशीर होतो. या विषयावर पालकांनी मुलांसोबत संवाद  साधणे गरजेचे आहे. 
- डॉ. मीनाक्षी देशपांडे,  स्त्रीरोगतज्ज्ञ 

मुलींमध्ये ‘सेक्‍शुअल ॲक्‍टिव्हिटिज’चे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पंधरा ते एकोणवीस वयोगटातील तरुणींचे गर्भपात करण्याचे प्रमाणही वाढले आहे. गर्भपात  केल्यामुळे तरुणींना अनेक शारीरिक  समस्यांना पुढील काळात सामोरे जावे 
लागते. 
- डॉ. चित्रा दाते, स्त्रीरोगतज्ज्ञ 

आजकालची पिढी एकमेकांकडे लगेच आकर्षित होतात. पालकांकडून पुरेसे प्रेम  मिळत नसल्याचा तो परिणाम आहे. तसेच, मुलींना शारीरिक संबंधांबद्दल अपुरी माहिती असते. त्यांना गर्भपाताचे धोके कळत नाहीत. सतत गर्भपात केल्यामुळे नंतर गर्भधारणेत अडचणी येतात. 
- गौरी वेद, संचालिका, स्टेप अप संस्था 

कमी वयातील गर्भपाताची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. गर्भपाताची सुविधा सर्वत्र उपलब्ध करून देण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. ‘एमटीपी’ कायद्यानुसार गर्भपात केंद्र काम करीत आहे की नाही, यासाठी पाच परिमंडळ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. 
- डॉ. अंजली साबणे, सहा. आरोग्य अधिकारी 

Web Title: #SexEducation Girls at an early age are pregnant