पंतप्रधानांच्या ‘मन की बात’मध्ये शबरी नॅचरल्सचा उल्लेख

पंतप्रधानांच्या ‘मन की बात’मध्ये शबरी नॅचरल्सचा उल्लेख
Published on: 

NSK26H33545 ( फक्त वरचा घेणे)
‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शबरी नॅचरल्सचा उल्लेख केला.

पंतप्रधानांकडून शबरी नॅचरल्सचे कौतुक

‘मन की बात’मध्ये उल्लेख, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमुळे जागतिक ओळख

सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२५ : ‘शबरी नॅचरल्स’चे पॅकेजिंग हे केवळ उत्पादनांचे वेष्टन नसून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या पॅकेजिंगला आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ जाहीर झाल्याने आदिवासी संस्कृतीला जागतिक व्यासपीठ मिळाले आहे, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून शबरी नॅचरल्सच्या उपक्रमाचे कौतुक केले.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत आदिवासी बांधवांच्या पारंपरिक कला, कौशल्य आणि उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमातून ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांना चालना मिळत आहे. ‘शबरी नॅचरल्स’च्या उत्पादनांचे पॅकेजिंग हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील वारली, गोंड आणि चित्रकथी यांसारख्या कला परंपरा, तसेच आदिवासी लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब या पॅकेजिंगमधून उमटते. या वैशिष्ट्यपूर्ण पॅकेजिंगला ‘इंडिया डिझाईन मार्क’ तसेच जपानचा प्रतिष्ठित ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ प्राप्त झाला आहे. या सन्मानांमुळे शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.
….

शबरी नॅचरल्स हा केवळ उत्पादनांचा ब्रँड नसून महाराष्ट्रातील आदिवासी समाजाची समृद्ध परंपरा, कला आणि कौशल्य जगासमोर मांडणारा उपक्रम आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म आणि कॉर्पोरेट गिफ्टिंगच्या माध्यमातून आदिवासी उत्पादनांना अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास मदत होईल.
- डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com