हडपसर - येथील पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ लावणी नृत्यांगना व गायिका नंदा व उमा लाखे इस्लामपूरकर यांना जाहीर झाला आहे. लावणी नृत्यांगणा अश्विनी मुसळे यांना लोकसाहित्यिक ‘डॉ. भास्करराव खांडगे’ पुरस्कार तर, शाहीर हसन शेख पाटेवाडीकर यांना ‘बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार’ यावेळी देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे यांनी दिली.