एकलहरे येथील दर्ग्यातील 
दानपेटी फोडून चोरी

एकलहरे येथील दर्ग्यातील दानपेटी फोडून चोरी

Published on

मंचर, ता. ७ : एकलहरे (ता. आंबेगाव) येथील शाहमदार बाबा दर्ग्यात चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील सुमारे पाच हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. तसेच, सभामंडपातील लाइट फिटिंगची तोडफोड करून सुमारे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
चोरट्यांनी दर्ग्यात प्रवेश करून सभामंडपातील लाइट फिटिंग दगडाने फोडून टाकली. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थ व भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे हिंदू- मुस्लिम समाजातील ग्रामस्थ शाहमदार बाबा उत्सव एकत्र साजरा करतात.
माजी उपसरपंच दीपक डोके यांनी सांगितले की, दर्ग्यात तोडफोड होण्याची ही तिसरी घटना असून, अज्ञात समाजकंटकांकडून वारंवार नुकसान केले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
याबाबत माजी सरपंच संतोष डोके यांनी सांगितले की, वारंवार होणाऱ्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, लवकरच येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी एकलहरे येथील जिल्हा परिषद शाळेजवळील कमलजादेवी मंदिरातही चोरीची घटना घडली होती. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मंचर पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com