पुणे - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शहरचे हंगामी शहराध्यक्ष म्हणून शैलेंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली. रिपाइंच्या शहर समितीच्या रविवारी आयोजित सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. .बैठकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. या वेळी पुणे शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण यांची हंगामी शहराध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली..बैठकीस रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी रोहिदास गायकवाड, आसित गांगुर्डे, अशोक शिरोळे, अशोक कांबळे, हिमाली कांबळे, नीलेश आल्हाट, बाबूराव घाडगे, महेंद्र कांबळे, रफिक दफेदार, भगवान गायकवाड, वसंत बनसोडे, महादेव दंडी, महादेव कांबळे, सुगत धसाडे आदी उपस्थित होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.