घोरपडीमधील 'हा' भाग बनला कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

corona.gif
corona.gif
Updated on

घोरपडी (पुणे) : बी. टी. कवडे रस्ता येथील शक्तिनगर वस्तीमध्ये करोनाचे तीन दिवसात सतरा रुग्ण आढळले आहेत. मागील आठवड्यात एका मटण विक्रेत्याला कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर वस्तीतील इतर नागरिकांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये २५ नागरिक पैकी सतरा जण कोरोना बाधित असल्याचा रिपोर्ट आला. काल हे अहवाल आल्यानंतर वस्तीतील सर्व नागरिकांची चाचणी करण्यात येत आहे. यामध्ये आणखी रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असून त्याबाबत काळजी घेत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

 जवळपास पाचशे लोकवस्ती असलेल्या या झोपडपट्टीमध्ये अतिशय दाटीवाटीने घरे आहेत. तसेच अनेक नागरिकांकडे स्वतः चे शौचालय नाही. त्यामुळे इथे रुग्णाची संख्या वाढू नये यासाठी या वस्तीतील काही कुटुंबांना ढोले पाटील रोडवरील महात्मा फुले शाळेमध्ये स्थलांतरित केले आहे. तसेच वस्तीतील १५० नागरिकांचे स्वॅब घेतले असून याचे अहवाल येणे बाकी आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी वस्तीमध्ये फवारणी आणि आरोग्य सर्वेक्षण सुरू केले आहे.अशी माहिती ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे सह आयुक्त दयानंद सोनकांबळे यांनी दिली.

सध्या बी. टी. कवडे रस्त्यावरील शिवदत्त कॉलनी, पवार इंटरप्राईज, श्रीनाथ नगर, ढवळे वस्ती, निगडे वस्ती या परिसरात  काही रुग्ण आढळले आहेत.  लॉकडाऊन संपल्यानंतर घोरपडी परिसरात रुग्ण संख्या वाढली आहे.   परिसरात जवळपास ५० रुग्ण असून त्याबाबत मात्र नागरिकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. रस्त्यावर रोज गर्दी होत असून नागरिक कोणत्याही नियमांचे पालन करत नाही असे दिसून येते. सोबत घोरपडी मधील उच्चभ्रू लोकांची सोसायटी असलेला सोपान बाग परिसरात देखील दोन रुग्ण सापडले. आतापर्यंत ग्रीन झोन म्हणून ओळख असलेला परिसर येथे रुग्ण सापडल्याने परिसरातील नागरिक घाबरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Regulatory Crackdown: Violation of Environmental Norms
Phased Traffic Implementation Schedule
The Encounter: Tactical Response and Self-Defense
young girl kidnapping
Marathi News Esakal
www.esakal.com